संपर्क लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संपर्क लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २१ मे, २०२०

थिंक महाराष्ट्र डॉट कॉम - निवेदन आणि आवाहनदेखील! (Think Maharashtra - Appeal)


वाचण्याकडे लोकांचा कल कमी होत आहे. ऐकण्या-पाहण्याकडे वाढत आहे. म्हणून आम्ही सोबत लेख आणि त्याचा ऑडियोही देत आहोत.
'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' हे वेबपोर्टल महाराष्ट्राचे, मराठी भाषासंस्कृतिचे सामर्थ्य प्रकट करावे; आणि त्याच वेळी, बदललेल्या काळात मराठी व जागतिक यांचा सांधा स्पष्ट व्हावा या हेतूने, दहा वर्षांपूर्वी सुरू केले. महाराष्ट्राचे कर्तृत्व 'वेड्या' व्यक्ती, उपक्रमशील संस्था आणि संस्कृतिसंचित या तीन अंगांनी व्यक्त करावे असा कार्यक्रम आखला. त्यासाठी तालुका हे केंद्र कल्पून माहिती संकलन सुरू केले; कधी मोहिमा हाती घेतल्या, कधी व्यक्तिगत दौरे केले. तशा प्रयत्नांत शंभरएक नामवंत आणि सर्वसाधारण माणसे स्वेच्छेने व स्वयंसेवेने सहभागी झाली. त्यामधून साडेतीन हजार सचित्र लेखांचे व एकशेबावीस व्हिडिओफितींचे संकलन 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'च्या वेबपोर्टलवर झाले आहे. वेबपोर्टल वर्षारंभी पुनर्बांधणीसाठी घेतले होते, ती झटापट महिना-दोन महिने करत होतो तोपर्यंत 'कोरोना काळ' आला. त्यामुळे पोर्टलवरील 'डेटा' अवलोकनार्थ सध्या उपलब्ध नाही, परंतु त्याच नावाने, https://www.thinkmaharashtra.org/ हा ब्लॉग सुरू करून महाराष्ट्र व मराठी भाषासंस्कृती या संबंधात नवनवीन लेखन वाचकांसमोर गेले दोन महिने सादर करत आलो आहोत.
          'थिंक महाराष्ट्र'ची घोषवाक्ये दोन आहेत -  १. 'थिंक महाराष्ट्र लिंक महाराष्ट्र', २. 'मराठी माणसाचा चांगुलपणा व त्याची प्रज्ञाप्रतिभा यांचे नेटवर्क'. पोर्टलवर जेमतेम साडेतीन हजार लेख दहा वर्षांत जमा होऊ शकले, त्याचे कारण मर्यादित साधनसंपत्ती हेच आहे. पण त्यामधून एक अंदाज आला, की महाराष्ट्राचे समग्र चित्र सादर करायचे तर पोर्टलवर सुमारे दीड लाख लेख असावे लागतील. त्यानंतर मग सततचे 'अपडेटिंग' हे पुढील पिढ्यांचे काम राहील. हा एक मोठा कोशच असणार आहे. आम्ही त्याचे वर्णन महाराष्ट्राचे म्युझियम व कंटेंप्ररी जर्नल असेच करतो.
          थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हा प्रकल्प गेली दहा वर्षें चालू आहे. अपुऱ्या साधनसामग्रीमुळे त्यास मर्यादा खूप आहेत. ते काम महादेवशास्त्री जोशी यांनी करून ठेवलेल्या ‘भारतीय संस्कृतिकोश’ या कामाच्या कितीतरी पुढे जातेकारण त्यास हजारो हात लागणार आहेत. ती किमया इंटरनेट माध्यमाची (क्राऊड सोअर्सिंग). त्यामुळे बारा कोटी महाराष्ट्रीयन लोक एकमेकांशी जोडले जाऊ शकतात व नित्य संपर्कात राहू शकतात.
त्याची काही वैशिष्ट्ये अशी जाणवतात:
- तो गावोगावची अस्मिता जपण्याचा व जागती ठेवण्याचा अभिनव व विधायक मार्ग आहे! 
- त्यामधून मल्टिमिडियाच्या अनेक शक्यता तयार होतात. जुनी पिढी वाचन एके वाचन अशी महती सांगत राहिलीत्यापुढे जाणे होते व म्हणून कालानुरूपता साधली जाते.
-थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉमच्या प्रयत्नांत मराठी माणसाचा आत्मविश्वास जागा होण्याची शक्यता दिसते. मराठी माणूस जात्या संकोचीप्रसिद्धीपराङ्मुख. त्यामुळे त्याची कामगिरी/कर्तबगारी जगापुढे येत नाहीचपरंतु त्याची त्यालाही कळत नाही. ‘व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशनच्या तालुकावार पाहणीत प्रत्येक तालुक्यात पंधरा ते पंचवीस माणसे विविध क्षेत्रांत असाधारण कामगिरी करतात असे दिसून आले. त्या सगळ्यांचे कर्तृत्व एकत्र प्रकट झाले तर मराठी माणसाचा आत्मविश्वास दुणावणार नाही का?
- थिंक महाराष्ट्र डॉट कॉमसारखा स्थानिक संस्कृतीचे जतन/संवर्धन करता करता जगाशी जोडून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न जगात अन्यत्र कोठे नाही. त्या अर्थाने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ लोकल व ग्लोबल या ‘ग्लोकल’ पेचावर उत्तम इलाजाचे ‘मॉडेल’ ठरू शकते!
          महाराष्ट्राच्या शक्तिसामर्थ्याचा आगळावेगळा प्रत्यय या प्रयत्नातून आला. तो वेळोवेळी नोंदलाही. राज्याच्या तालुक्यातालुक्यांत एक नवे जागरण सुरू आहे. त्यात गुंतलेल्या व्यक्ती प्रत्येक तालुक्यात पंधरा ते पंचवीस आढळतात असे आधी म्हटले. त्यांचे काम जुनी हस्तलिखिते जमा करणे येथपासून ते अभिनव शेतीसाधनांची निर्मिती करणे येथपर्यंत विविध तऱ्हांचे, बुद्धिमत्तेचे-कौशल्याचे व कलेचेही आहे. त्या कार्याचा ठसा समाजावर उमटत आहे, परंतु त्याची नोंद प्रस्थापित सरकार, मीडिया, सामाजिक-सांस्कृतिक संस्था घेत नाहीत. त्या नवजागरणास विचारांचा आधार लाभलेला नाही आणि त्यामुळे स्वाभाविकच, ते कार्य पारंपरिक मूल्यभावात अडकलेले भासते. त्यात प्रागतिकता वा पुरोगामित्व जाणवत नाही.
          उलट, प्रस्थापितांच्या अधीन संस्था व व्यक्ती यांच्यामध्ये विचार व मते यांची सरळसरळ दुफळी सध्या पडली आहे. प्रत्येक मुद्दा आला, की दोन गट तयार होतात, त्यामध्ये त्या मुद्द्याचे गुणावगुण बाजूलाच राहतात. ताजे ढळढळीत उदाहरण म्हणजे वारीसंबंधात फडणवीस यांनी घेतलेली भूमिका अतार्किक व आडमुठेपणाने सरकारला कैचीत पकडण्याची आहे! त्यांची तशीच दयनीय अवस्था मराठा मोर्च्यात त्यावेळच्या विरोधकांकडून राजकारण प्रकटले तेव्हा झाली होती हे त्यांना आठवत नाही का? विचारांची विविधता व मतभिन्नता या गोष्टी स्वाभाविक आहेत. पण त्यामागे हट्ट, पूर्वग्रहदूषितता नसावी. उलट, भावविचार मने खुली करुन, गेल्या काहीशे व हजारो वर्षांची मानवसमुदायाने जमा केलेली पुंजी समजून घेऊन व्यक्ती-देश-धर्मनिरपेक्ष केलेला असावा.'थिंक महाराष्ट्र'चे व्यासपीठ सत्तेचे राजकारण व गुंडगिरी हे दोन विषय वर्ज्य मानते. तरी तेच उदाहरण येथे नमूद केले, कारण येथील सुबुद्ध, सुसंस्कृत माणसालादेखील सारे काही राजकारणात बघण्याची सवय झाली आहे. सुशिक्षित, सुस्थित, विचारी व संवेदनशील समाजाने तात्कालिक राजकारणाच्या व कालबाह्य विचारसरणींच्या पलीकडे जाऊन समाजासमोर येणाऱ्या मुद्द्यांचा विचार करावा, तो वस्तुनिष्ठ पद्धतीने, निर्भीडपणे मांडावा आणि त्यामधून समाजाची अशी काही सहमती बांधली जावी असे 'थिंक महाराष्ट्र'चे एक उद्दिष्ट आहे.
          यापुढील लॉकडाऊन काळातील नोंदी एकत्रित करताना वाचकांसमोर दोन तऱ्हांचे लेख सादर करण्याचा प्रयत्न आहे. एक म्हणजे उमेदीच्या व्यक्तींचा परिचय करून देत राहूच. त्यामुळे महाराष्ट्रातील नवजागरणाचा प्रत्यय वाचकांना घेता येईल. त्याबरोबर समकालीन प्रश्न, समस्या, मुद्दे वस्तुनिष्ठ रीत्या वाचकांसमोर मांडण्याचा बेत आहे. वाचकांनी उमेदीच्या व्यक्तींना पाठिंबा द्यावा, त्यांचे कौतुक करावे, त्यांच्या कामामागील विचारभावना जाणून घ्याव्या आणि प्रश्न-समस्या-मुद्दे यांची चिकित्सा, ते नीट मनाने व तटस्थ बुद्धीने आकलन करून घेऊन ती मांडावी. धन्यवाद.
- दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)
---------------------------------------------------------------------------------------------------------

गुरुवार, १२ मार्च, २०२०

थिंक महाराष्ट्र डॉट कॉम - देणगीसाठी आवाहन


आवाहन! आवाहन!! आवाहन!!!
महाराष्ट्राच्या साहित्यसंस्कृतीचा वारसा
जपण्याच्या कार्यास हातभार (खरे तर, तन-मन-धन झोकून देऊन)
लावा
आणि करबचतही करा
तुमचे पाचशे रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक सहकार्य एका मोठ्या चिरंजीवी कामासाठी खर्च होत आहेत यावर विश्वास ठेवा.
त्या कार्याचे
सारे तपशील उपलब्ध आहेत.
महाराष्ट्राच्या तालुका तालुक्यांतील नवजागरण अधोरेखित करणारा,
महाराष्ट्राचा अभिमान जागवणारा भव्य प्रकल्प!-  थिंक महाराष्ट्र डॉट कॉम.
सध्या लेखसंचय आहे तीन हजारांचा - यावर्षीचा संकल्प पाच हजारांचा.
तेथे आपण यशस्वी झालो तर पुढील प्रगती हनुमान उड्यांनी होईल
!
दिनकर गांगल यांच्या संपादनाखाली चालू असलेले एक मोठे कोशकार्य
(की महाराष्ट्राचे म्युझियम)
! भेट देऊन तर पाहा.
सुशिक्षित, सुसंस्कृत व संवेदनशील आणि सामाजिक बांधीलकी/सामिलकी मानणाऱ्या, समाजाप्रती सजग असणाऱ्या व्यक्ती तेथे पुन्हा पुन्हा भेट देतील अशी खात्री आहे.
सहकारी संचालक - प्रवीण शिंदे, डॉ.यश वेलणकर, सुदेश हिंगलासपूरकर, राजीव श्रीखंडे
पूर्णवेळ कार्यकर्ते - नितेश शिंदे, राजेंद्र शिंदे.

बँक डिटेल्स -

State Bank of India
A/c No. – 31759182464, IFSC code – SBIN0005352
Branch - Dadar (East)

----------------------------------------------------------------------------------------------
                                                      आवाहन

ग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनया संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फतथिंक महाराष्ट्र डॉट कॉमहे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच थिंक महाराष्ट्र डॉट कॉमहे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.
थिंक महाराष्ट्रप्रकल्पाची व्याप्ती क्षितिजाएवढी आहे. कारण या प्रकल्पात महाराष्ट्रातील चांगुलपणा आणि प्रज्ञाप्रतिभा यांच्यामध्ये दुवा साधायचा आहे. त्या दृष्टीने वेबपोर्टलवर तीन प्रकारे माहितीचे संकलन केले जाते.
·      कर्तबगार व्यक्ती
·      स्वयंसेवी व उपक्रमशील संस्था
·      मराठी समाज व संस्कृती यांच्या वैभवाचे डॉक्युमेन्टेशन
दहा वर्षांत वेबपोर्टलवर साडेतीन हजार लेख आणि एकशे अठरा व्हिडिओ प्रसिद्ध झाले. ते तुम्ही सोबतच्या लिंकवरून पाहू शकता.
 ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम हे वेबपोर्टल मोठी झेप घेण्याच्या दृष्टीने सज्ज होत आहे. एक वर्षभरात थिंक महाराष्ट्र डॉट कॉमचा जो मुख्य हेतू आहे - महाराष्ट्राची प्रज्ञाप्रतिभा आणि येथील चांगुलपणा यांचे नेटवर्क तो साधला जाण्याच्या दृष्टीने काही कार्य पक्केपणाने सुरू होईल. त्यामधून मराठी भाषा- संस्कृतीचे दर्शन संवर्धन साधेल.
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम इंग्रजी भाषेतही यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. थिंक महाराष्ट्र डॉट कॉम हे वेबपोर्टल व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे चालवले जाते. ती नॉन प्रॉफिट प्रा. लि. कंपनी आहे. थिंक महाराष्ट्र डॉट कॉम ही चळवळ व्हावी यासाठी तिचे पब्लिक लि. कंपनीत रूपांतर करण्याचा मानस आहे, पण तो काही वर्षांनंतर! दरम्यान, या प्रा. लि. कंपनीचे दोनशे भागधारक करता येऊ शकतात. त्या कलमानुसार तेवढे पेट्रन मेंबर बनवून त्या सर्वांना समान भाग द्यावेत व ती मंडळी व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन या भविष्यवेधी संस्थेचे संस्थापक सभासद असावेत असे आखले आहे.
तुम्हाला विनंती अशी, की कृपया व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन च्या नावे बारा हजार पाचशे रुपये पाठवून एका मोठ्या प्रकल्पाचे भागीदार व्हावे. पेमेंट करण्याबाबतचे तपशील पुढे दिले आहेत. थिंक महाराष्ट्र डॉट कॉमचा फोल्डर सोबत जोडला आहे. त्यावरून कल्पना येईल.
कदाचित अशी शक्यता आहे, की आताच तुम्हाला साडेबारा हजार रुपये भरून या कार्यात सहभागी होता येत नाही. तुम्हाला विनंती अशी, की थिंक महाराष्ट्र डॉट कॉम या वर्षभरात उद्दिष्टाच्या दिशेने मार्गस्थ व्हावे यासाठी शुभेच्छा म्हणून पाचशे ते पाच हजार रुपये पर्यंतची देणगी व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनच्या नावे द्यावी.
चेक व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशनया नावाने २२, पहिला मजला, मनुबर मेन्‍शन, १९३ आंबेडकर रोड, चित्रा सिनेमासमोर, दादर (पूर्व), मुंबई - ४०० ०१४ या पत्‍त्यावर पाठवावा. तुम्‍हाला व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनच्‍या बँक खात्‍यातही पैसे पाठवता येतील आणि ऑनलाईन ही डोनेशन सोबतच्या लिंकवरून ट्रान्‍सफर करता येतील.
State Bank of India                                Cosmos Bank
A/c No. – 31759182464                           A/c No. –  0121001015862  
IFSC code – SBIN0005352                     IFSC code – COSB000002
Branch - Dadar (East)
                                                 Branch - Dadar (West)
व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनआयकर कायद्याखालील ८०जी (80G) कलमानुसार देणगीदारास आयकरात सूट देण्यासाठी प्रमाणीत आहे.
८०जी प्रमाणपत्र क्रमांक DIT(E)/MC/80G/2920/2011-12

पैसे ट्रान्‍सफर केल्‍यानंतर किंवा चेक पाठवल्‍यानंतर आम्‍हाला कळवावे ही विनंती. पैसे जमा होताच त्‍याची पावती तुमच्‍या पत्‍त्यावर पोस्‍टाने पाठवण्‍यात येईल.
कळावे.
आपले,
दिनकर गांगल, प्रवीण शिंदे, राजीव श्रीखंडे, सुदेश हिंगलासपूरकर, डॉ. यश वेलणकर
--------------------------------------------------------------------------------------

‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चे प्रकल्प

१. व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनने कृतार्थ मुलाखतमाला नावाचा उपक्रम तीन वर्षें चालवला. त्या मुलाखतींत वयाचा अमृत महोत्सव पार केलेल्या मंडळींनी त्यांच्या आयुष्यामधील कृतार्थता वर्णन करून सांगितली आहे. त्यात ग्रंथालीआणि माधवबागयांचे सहकार्य अधुनमधून लाभले. त्या मुलाखतींच्या प्रत्येकी सुमारे दोन तासांच्या तीस व्हिडिओ फिल्म संकलनासाठी वाट पाहत आहेत. त्यांतील काही भाग युट्यूबवर उपलब्ध केला आहे.

२. हिंद स्वराजची शताब्दी - महात्मा गांधी यांनी १९०९ साली लिहिलेल्या या पुस्तकाची शताब्दी होऊन गेली. त्या निमित्ताने व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनने महाराष्ट्रव्यापी दोन दिवसांचा परिसंवाद पुण्यात योजला. त्यासाठी गांधीभवन यांचे सहकार्य लाभले. महाराष्ट्रातून सुमारे एकशेपस्तीस मंडळी त्यासाठी स्वेच्छेने आली. त्यात अभय बंग, मोहन हिराबाई हिरालाल, सु.श्री. पांढरीपांडे, विवेक सावंत, रामदास भटकळ असे मान्यवर होते. दोन्ही दिवसांचे व्हिडिओ शूटिंग तयार आहे. ते तुम्ही सोबतच्या लिंकवरून पाहू शकता.

३. महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित (थिंक महाराष्ट्र डॉट कॉमवरील निवडक साहित्याचे प्रकाशन) ही वर्षाला एक पुस्तक अशी मालिका योजली होती. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यांचे स्वागत झकास झाले. मात्र तो उपक्रम निधीअभावी पुढे रेटला गेला नाही.

४. लोकशाही सबलीकरण अभियान - महाराष्ट्रातील पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांची मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने दोन दिवसांची कार्यशाळा 2015 मध्ये आयोजित करण्यात आली होती.

५. सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध प्रकल्पास झंझावती यश लाभले. सोलापूरविषयक साहित्य थिंक महाराष्ट्र डॉट कॉमवर रोज एक-दोन लेख या वेगाने प्रसिद्ध होत गेले. सोलापूर जिल्हा संस्कृतिवेधमध्ये जे सांस्कृतिक विचारमंथन झाले. त्याचा पाठपुरावा तळेगाव येथील दोन दिवसांच्या चिंतन शिबिरात घेण्यात आला. तेथील उपस्थिती व प्रतिनिधींचा सहभाग लक्षणीय होते. तळेगावला मुख्य तीन गोष्टी ठरल्या. अ.  सोलापूर जिल्हा संस्कृतिवेधच्या धर्तीवर जिल्हावार मोहिमा न घेता त्या तालुकावार घ्याव्यात. त्या दृष्टीने पाच तालुके मुक्रर करण्यात आले. चाकण, अलिबाग व मुरुड या ठिकाणी तशा प्रकारच्या बैठका झाल्या. बैठकांना उपस्थिती चांगली होती, परंतु थिंक महाराष्ट्र डॉट कॉममधील सहभागाच्या दृष्टीने प्रतिसाद कोमट राहिला. ब. कॉलेजा-कॉलेजांत ज्ञानमंडळे हा उपक्रम अपूर्व ठरू शकतो. त्याला नंतरच्या चर्चेत स्पर्धात्मक स्वरूप देऊन त्यामधील सहभाग कसा वाढवता येईल या दृष्टीने छान छान सूचना आल्या आहेत. क. ज्ञानमंडळांचा भाग म्‍हणून 'आचार्यकुला'ची कल्‍पना मांडण्‍यात आली.

६. जिल्हावार सृजनयात्रा - थिंक महाराष्ट्र डॉट कॉमवर सादर केल्या जाणा- माहितीमध्ये समाजातील चांगुलपणा आणि विधायक घडामोडी यांचा विचार आणि शोध अंतर्भूत आहे. थिंक महाराष्ट्रने समाजातील सकारात्मकतेचा आणि चांगुलपणाचा वेध घेण्याच्या उद्देशाने जिल्हावार मोहिमा सुरू केल्या. त्यातून उस्मानाबाद जिल्ह्याची सृजनयात्रा आखण्यात आली. उस्मानाबाद जिल्ह्यात साहित्य संमेलनाच्या आधीचा पूर्ण आठवडा थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम ग्रंथाली यांच्यामार्फत कार्यक्रमांची धमाल उडवून देण्यात आली. त्याला आविष्कार सप्ताहअसे नाव देण्यात आले होते. तो कार्यक्रम ०१ जानेवारी २०२० ते ०९ जानेवारी २०२० या कालावधीत संपन्न झाला.  त्याला प्रतिसाद उबदार मिळाला.
७. दुर्मीळ पुस्तकनिर्मिती जुन्या पुस्तकांची ओढ समाजात निर्माण झालेली आहे. तिचा फायदा घेऊन तशी पुस्तके निर्माण करावीत व ती ठरावीक खरेदीदारांना प्रिंट टु ऑर्डर पद्धतीने विकत द्यावी. जेणेकरून ज्ञानसाधन निर्माण होईल व थिंक महाराष्ट्र डॉट कॉमच्या गंगाजळीत चार पैसे जमा होतील, असा हा प्रकल्प. अशा प्रत्येक पुस्तकास फक्त दहा हजार रुपयांचा स्पॉन्सर हवा असतो.
८. थिंक टॉक – ‘थिंक टॉकमध्ये कल्पना अशी आहे, की वेगळा विचार अथवा/आणि वेगळे कार्य करणाऱ्या व्यक्तींचे चार मिनिटांचे भाषण ऑडियो/व्हिडियो स्वरूपात रोज सकाळी ११:०० वाजता थिंक महाराष्ट्र डॉट कॉमवर प्रसृत करणे. थिंक टॉकसाठी पाच रेकॉर्डिंग झाली आहेत. त्या प्रत्येक दहा मिनिटांच्या भाषणास रेकॉर्डिंग व अपलोडिंग यासाठी सहा हजार रुपयांचा स्पॉन्सर मिळण्याची गरज आहे.
९. लेखकांची माहिती - महाराष्‍ट्रातील समस्‍त लेखकांची माहिती ऑनलाईन आणण्‍याचा एक प्रकल्‍प 2010 साली, 'थिंक महाराष्‍ट्र'च्‍या आरंभकाळी हाती घेण्‍यात आला होता. त्यावेळी महाराष्‍ट्रातील '' ते 'ज्ञ' अक्षरांच्‍या लेखकांची यादी डोळ्यांपुढे ठेवून काम सुरू करण्‍यात आले. '' अक्षरापर्यंतच्‍या सर्व लेखकांना पत्रे पाठवून त्‍यांच्‍याकडून त्‍यांची वैयक्तिक माहिती, त्‍यांची पुस्‍तके, प्रकाशन वर्ष, पुस्‍तकाचा सारांश, त्यावरील परीक्षणे अशा अनेक घटकांसंबंधीची माहिती मागवण्‍यात आली होती. शेकडो लेखकांनी त्‍यास प्रतिसाद देऊन त्‍यांची माहिती 'थिंक महाराष्‍ट्र'कडे पाठवली आहे. ती माहिती योग्‍य प्रकारे मांडण्‍याकरता लायब्ररीयन हेमंत शेट्ये यांनी फॉरमॅट सुचवला. फारच थोड्या लेखकांची माहिती त्‍या फॉरमॅटमध्‍ये नमूद करता आली. उर्वरित माहिती कागदपत्रांच्‍या आणि इमेल्‍सच्‍या रुपामध्‍ये आहे. तेथेही स्पॉन्सर हवा आहे.
१०. जोडप्‍यांच्‍या मुलाखती - पस्‍तीस ते चाळीस वयोगटातील जोडप्‍यांशी गप्‍पा मारून त्यांच्‍या सांस्‍कृतिक जीवनाचा गाभा आणि त्‍यांची जीवनशैली जाणून घ्‍यावी या उद्देशाने 'व्हिजन महाराष्‍ट्र'ने 'वैद्य साने ट्रस्‍ट'सोबत जोडप्‍यांच्‍या मुलाखती घेण्‍याचा उपक्रम 2012 साली राबवला. त्‍यासाठी 'थिंक महाराष्‍ट्र'च्‍या प्रतिनिधींनी पस्‍तीस जोडप्‍यांच्‍या मुलाखती घेतल्‍या. त्‍या मुलाखतींतून हाती आलेल्या माहितीवर पुढे काम मात्र झालेले नाही. कारण त्या प्रकारच्या अभ्यासकास देण्यासाठी लागणारे मानधन.
 ११. विचारमंथन - समाजसंस्‍कृतीच्‍या काही विषयांवर गंभीर, सर्वांगीण आणि खुली चर्चा व्‍हावी यासाठी ऑक्‍टोबर 2012 मध्‍ये माधवबागच्‍या साथीने 'विचारमंथन' या कार्यक्रमाची सुरूवात करण्‍यात आली. त्यामध्‍ये 'अभिजात वाचकाच्‍या शोधात' आणि 'चित्रकलेचे बाजारीकरण' या दोन विषयांवर अनेक मान्‍यवरांना सोबत घेऊन खोपोली येथील 'माधवबाग'मध्‍ये चर्चा घडवण्‍यात आल्‍या. मात्र तो कार्यक्रम अधिकाधिक व्‍यक्‍तींपर्यंत पोचवण्‍यासाठी एखाद्या चॅनलेची साथ घ्‍यावी या उद्देशाने तो कार्यक्रम स्‍थगित करण्‍यात आला आणि चॅनलसोबत बोलणी सुरू झाली. ती बोलणी फळाला आली नाहीत.
१२. समाजसेवेचा इंद्रधनू- पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षभरातील अनेक कार्यक्रमांची सांगता झाली. शतगुणी पुलं यांच्या समाजसेवेप्रती असलेल्या भावनेचा वसा जपण्यासाठी व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनने समाजसेवेचा इंद्रधनूनावाचा वैशिष्ट्यपूर्ण व सतत चालू राहील असा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याचा आरंभ २७ नोव्हेंबर २०१९ मध्ये झाला. पुण्याच्या सा’(स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन) या संस्थेने त्या उद्घाटनपर कार्यक्रमाचे यजमानपद स्वीकारले होते. समाजसेवेचा इंद्रधनूहे स्वयंसेवी संस्थांचे नेटवर्क व्हावे अशी अपेक्षा आहे. त्यासाठी व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशनचे थिंक महाराष्ट्र डॉट कॉमहे ऑनलाईन व्यासपीठ वापरले. त्या कार्यक्रमात चार संस्था सहभागी झाल्या होत्या.