जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांच्याशी गप्पा (A Talk with Environmentalist Madhav Gadgil)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांच्याशी गप्पा (A Talk with Environmentalist Madhav Gadgil)

 

जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांच्याशी ऑनलाइन गप्पा ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनच्या ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉमतर्फे शनिवार, 26 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजता योजण्यात आल्या आहेत. विषय आहे निसर्ग संरक्षण : लोकसहभागाने की जुलूम जबरदस्तीने? 

या गप्पांना संदर्भ आहे तो माधव गाडगीळ यांच्या ताज्या विधानाचा. त्यांनी म्हटले आहे, की “प्राण्यांच्या शिकारी आपल्या देशात पूर्वीपासून होत आहेत. परंतु वन्यजीव संरक्षण कायदा आला आणि या शिकारी बंद झाल्या. हे अन्नसाखळीच्या विरोधात आहे. आता गावा-गावांमध्ये बिबटे घुसून माणसांना मारत आहेत. हत्ती शेतीची नासधूस करत आहेत. त्यामुळे वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करून पुन्हा शिकारीला परवानगी दिली पाहिजे !” पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे ते परखड मत ऐकून व वाचून पर्यावरण प्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत ! त्यांना भीती वाटते, की वन्य जीव संरक्षण कायदा रद्द केला तर प्राण्यांच्या सर्रास कत्तली होतील ! तस्करी करणाऱ्यांना मैदान मोकळे मिळेल...

या ऑनलाइन कार्यक्रमात माधव गाडगीळ निवेदन करतील व नंतर श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतील. प्रस्तुत ऑनलाइन कार्यक्रमात सोबतच्या झूम लिंक वरुन सहभागी होता येईल : https://us06web.zoom.us/j/89374789144

--------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या